Dr. Sampada Munde | वादग्रस्त अधिकारी सुनील महाडिकने पोलीस ठाण्याला बनविले कत्तलखाना | Rahul Kul

Lay Bhari News Lay Bhari News

140,599
2 tháng trước
#sampadamunde #Sunilmahadik #rahulkul #ranjitnaiknimbalkar #devendrafadnavis #jaykumargore #laybharinews #tusharkharat

आपल्या हातामध्ये सुरा घेऊन अत्यंत निर्दयीपणे जनावरांचे कत्तल करणारे कसाई आपल्याला गावोगावी आढळतात. या कसाया सारखा एक मनुष्य या पृथ्वीतलावर आहे. दुर्दैवाने तो पोलीस अधिकारी आहे. तो लोकशाहीची, संविधानाची खुलेआम कत्तल करत आहे. कायदा आपल्या घरी पाणी भरतो असा समज या खाकी वर्दीतील कयाचा झालेला दिसतोय. सुनील महाडिक असे या कसायाचे नाव आहे. संविधानाच्या, लोकशाहीच्या या कसायाच्या कारस्थानांमुळे फलटणच्या डॉक्टर संपदा मुंडे यांचा बळी गेलेला आहे. संपदा मुंडे यांना या सुनील महाडिकने छळलं होतं. तिचं म्हणणं ऐकून न घेता त्या विरोधातील तक्रार केली होती. तिचा मोबाईल सुनील महाडिकने ब्लॅक लिस्ट केला होता. या सुनील महाडिकने यापूर्वी सुद्धा भयानक कांड केलेले आहेत. दौंड येथे कार्यरत असताना तू तेथील भाजपचे आमदार राहुल कुल यांचा घरगडी असल्याप्रमाणे काम करत होता. त्यावेळी त्याने महेश चोरमले नावाच्या एका धनगर कुटुंबाला प्रचंड छळले. चोरमले कुटुंबाची जमीन कुणाच्या तरी घशात घालण्यासाठी सुनील महाडिकने महेश चोरमले यांच्या आईच्या विरोधात एफ आय आर दाखल नसताना देखील पोलीस कोठडीत डांबले. महेश चोरमले व त्याच्या भावावर खोटा FIR दाखल करून तुरुंगात डांबले. नुकत्याच बाळंतीण झालेल्या महेश चोरमले यांच्या पत्नीवर खोटा FIR दाखल केला. तत्कालीन एसपी अभिनव देशमुख यांनी महेश चोरमले यांच्या बाजूने न्याय भूमिका घेतली होती. परंतु अभिनव देशमुख यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून या सुनील महाडीकने महेश चोरमले कुटुंबाला फार छळले. चोरमले यांनी आपले हे सगळे गाऱ्हाणे 'लय भारी'जवळ व्यक्त केलेले आहे.